Home क्राईम नाशिक कारागृहातून रजेवर बाहेर पडलेल्या फरार आरोपीला अटक

नाशिक कारागृहातून रजेवर बाहेर पडलेल्या फरार आरोपीला अटक

0
111

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना रजेवर कारागृहाबाहेर पडून फरार झालेल्या आरोपीला गुरूवारी १४ जुलै रोजी दुपारी एमआयडीसी पोलीसांनी तांबापूरा परिसरातून अटक केली आहे. बारकू बाबुराव कोळपे (वय-३५) रा. तांबापूरा, गवळीवाड, जळगाव असे  अटकेतील या आरोपीचे नाव आहे.

 

धुळे पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्हयात बारकू कोळपे यास धुळे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असतांना ५ जून २०२१ रोजी आरोपी कोळपे याला यास कोरेाना अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मुदतीत आरोपी बारकू कोळपे हा कारागृहात पुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या  मार्गदर्शनाखाली गुरूवारी १४ जुलै रोजी दुपारी २ वाजता गोपनिय माहितीच्या आधारे तांबापूरातून आरोपी बारकू कोळपे याला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, पो.कॉ. नाना तायडे यांनी अटक केली. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

 


Protected Content

Play sound