Home Cities जळगाव परिवर्तनच्या कला शिबिरास प्रारंभ

परिवर्तनच्या कला शिबिरास प्रारंभ

0
29
parivartan seminar

parivartan seminar

जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन जळगावतर्फे पाच दिवसीय कला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन व लोगोचे अनावरण आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उद्योजक किरण बच्छाव, मंजूषा भिडे, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, जागृती भिडे, योगेश पाटील व हर्षदा पाटील आदींची उपस्थिती होती. या थ्री डी शिबिरात १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी समृद्धी दशपुत्रे, शर्वरी दशपुत्रे, दीपक इंधाटे, अक्षय नेहेते, श्रुती सोनवणे, ऊर्जा गुरव, मिलिंद जंगम, कल्याणी सरोदे, अदिती जगताप, दर्शना वाणी, ओंकार पाटील, सोनाली पाटील, सुदीप्ता सरकार, किशोर पवार, अमित माळी, विजय जैन, राजू बाविस्कर, नितीन सोनवणे, सुचिता पाटील, मंगेश कुलकर्णी, होरिलसिंग राजपूत, संदीप केदार, अनिता नेमाडे, सुजाता नेहेते, रक्षत हिंगणेकर, सुनील बारी सहकार्य करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound