आदित्य पांचोली विरोधात कंगना राणावतच्या बहिणीचा बलात्काराचा आरोप

Aditya Pancholi

मुंबई (वृत्तसंस्था) कंगना राणावतची बहीण रंगोलीने अभिनेता आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप लावत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये रंगोलीने ई-मेलवरून पांचोलीवर मारहाण आणि लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. मात्र, आदित्य पांचोलीने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. 13 वर्षापूर्वीचे हे प्रकरण असून त्यावेळी आदित्य पांचोली आणि संबंधित अभिनेत्री यांचे एकमेकांशी चांगले संबध होते.

 

 

आदित्य पांचोलीने आपला बचाव करताना म्हटले की, माझ्यावर खोटे आरोप लावण्यात येत आहेत. आदित्य पांचोलीने या अभिनेत्रीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. हीच मानहानीची तक्रार मागे घेण्यासाठी या अभिनेत्रीने तिचे वकील रिजवान सिद्दीकींना 6 जानेवारी 2019 भेटीसाठी आपल्या घरी पाठवल होते. मात्र मी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने मला संबंधीत अभिनेत्रीने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, असा दावा आदित्य पांचोलीने केला. वकील रिजवान सिद्दीकी आणि माझ्यात झालेल्या चर्चेचे मी स्टिंग ऑपरेशन केले आहे. या स्टिंग ऑपरेशनचा 18 मिनिटांचा व्हिडीओ वर्सोवा पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त आणि अंधेरी मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट यांना सोपवला आहे. या व्हिडीओची सत्यताही पडताळण्यात आलेली आहे, असेही आदित्य पांचोलीने सांगितले.

Add Comment

Protected Content