फैजपूर येथील उत्कर्षा चौधरीची जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे निवड

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील  उत्कर्षा मनोजकुमार चौधरी ही नुकत्याच झालेल्या  जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

 

भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी नुकतीच प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत उत्कर्षा चौधरी हिने चांगले गुण संपादन करत यश मिळविले आहे. तिच्या  या यशासाठी ज्ञानदिपु शैक्षणिक स्पर्धा  परीक्षा क्लासेसचे   प्रा. संजय सातपुते यांचे,  गोदावरी इंग्लिश  मेडियम स्कूलच्या  शिक्षिका मीनल कुमार यांचे मार्गदशन लाभले.   मुळचे खिरोदा येथील उपकार्यकारी अभियंता मनोजकुमार पंडित चौधरी यांची सुकन्या आहे. उत्कर्षाने मिळविलेल्या यशाबद्दल तीचे  आ. एकनाथराव खडसे  आमदार शिरिष चौधरी,  खासदार रक्षा खडसे,   गोदावरी स्कूलच्या प्राचार्य भारती महाजन यानी अभिनंदन केले आहे.

Protected Content