Home क्राईम भ्रष्ट्राचार प्रकरण : पोलिसांनी बीडीओंचा नोंदवला जबाब

भ्रष्ट्राचार प्रकरण : पोलिसांनी बीडीओंचा नोंदवला जबाब


रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीच्या शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची तब्बल तीन तास चौकशी करून तपास अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे.

बहुचर्चेत वैयक्तिक शौचालय योजनेत करोडो रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याने या बाबत रावेर पोलिस स्टेशना गुन्हा दाखल असून आतापर्यंत आठ आरोपी अटकेत असून अनेक जणांवर अटकेची टांगती तलवार असतांना आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली.

यावेळी त्यांच्याकडून योजना संदर्भातील विविध माहीती जाणून घेत तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी जबाब नोंदवला आहे.


Protected Content

Play sound