Home Cities धरणगाव अ.भा.ग्राहक पंचायत धरणगाव तालुका बैठक उत्साहात

अ.भा.ग्राहक पंचायत धरणगाव तालुका बैठक उत्साहात


332581c4 240b 46c7 82e8 828e765c5c72

धरणगाव (प्रतिनिधी) अ.भा.ग्राहक पंचायत धरणगाव तालुक्याची बैठक महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.

 

माँ साहेब मीनाताई ठाकरे संकुलात ही बैठक घेण्यात आली. यावेळी धरणगाव तालुक्यात ग्राहक जागरण मेळावे आयोजित करणे, राष्ट्रीयकृत बँकाच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणे ,ग्राहक पंचायतीच्या सभासदांची संख्या वाढविणे,ग्राहक जागृतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस अ.भा.ग्राहक पंचायतीचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे,ग्राहक पंचायतीचे धरणगाव तालुका अध्यक्ष शांताराम बडगुजर,तालुका संघटक विनायक महाजन,तालुका सहसंघटक पत्रकार बाबूलाल बडगुजर,विनोद रोकडे, टोनी महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते. सूत्रसंचालन सुनील बडगुजर यांनी केले. तर आभार दिनेश तायडे यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound