Home Cities जळगाव नजीर शेख यांचा बदली विरोधातील अर्ज मॅटकडून नामंजूर

नजीर शेख यांचा बदली विरोधातील अर्ज मॅटकडून नामंजूर

0
32

जळगाव प्रतिनिधी । पोलीस अधिकारी नजीर शेख यांनी आपल्या बदलीच्या विरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटकडे दाखल केलेला अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चाळीसगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शेख नजीर यांची बदली औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलात केली होती. मात्र, तीन वर्षांचा कालावधी पूर्ण नसल्याचा दावा करत शेख यांनी या निर्णयाला मॅटमध्ये आदेशाला आव्हान दिले होते.न्यायाधीकरणाने शेख नजीर यांच्या प्रकरणात जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आलेल्या उत्तमराव कडलग यांना रुजू होता आले नाही. त्यांनी अर्जदार शेख हे २००८ ते २०१८ या कालावधीत जळगाव येथे सेवेत होते. तसेच त्यांची बदली निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार झाल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावरील सुनावणीअंती न्या. ए. एच. जोशी यांनी शेख यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound