Home क्राईम कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ

कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ

0
29
mahila

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कार घेण्यासाठी माहेरहून ८ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर येथील माहेर असलेल्या रेखा संतोष उंबरकर (वय-३६) यांचा विवाहित कल्याण येथील संतोष ज्ञानेश्वर उंबरकर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती संतोष याने विवाहितेला माहेरहून कार घेण्यासाठी ८ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी जामनेर येथे निघून आल्या.

याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती संतोष ज्ञानेश्वर उंबरकर, सासरे ज्ञानेश्वर रूंजाजी उंबरकर, सासू सुनिता ज्ञानेश्वर उंबरकर, दीर राजेश ज्ञानेश्वर उंबरकर, कृतिका राजेश उंबरकर, माधव रूंजाजी उंबरकर, पंडीत पुंडलीक उंबरकर रा. ठाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound