मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या व्हीपच्या विरोधात मतदान करणार्या ३९ आमदारांच्या विरोधात नवीन विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आज खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
आज झालेल्या विधानसभाध्यक्षांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांच्या मदतीने राहूल नार्वेकर यांचा विजय झाला. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हीपविरोधात मतदान केले. यावर आता शिवसेनेने कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने खासदार अरविंद सावंत यांनी आता नवीन विधानसभाध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
या संदर्भात अरविंद सावंत यांनी राहूल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाख केली आहे. या आमदारांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मान्यता असलेल्या पक्षाचे आदेशच चालतात, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षालाच मान्यता आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. यामुळे आता विधानसभाध्यक्ष यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.