मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे सदस्य राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपच्या राहूल नार्वेकर यांच्याशी होणार आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे काल आकस्मीकपणे राहूल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली. पक्षात अनेक ज्येष्ठ सदस्य असतांना त्यांना मिळालेली उमेदवारी लक्षणीय मानली जात आहे. दरम्यान, यामुळे आता त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या अनुषंगाने आज शिवसेनेचे राजन साळवी यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे.
राजन साळवी आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने मविआच्या तिन्ही घटक पक्षांमधील आमदारांना गुलाबी रंगाच्या लिफाफ्यातून व्हीप बजावण्यात येणार असल्याचे माजी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून परवा बहुमत चाचणी होणार आहे.