उदय सामंत देखील शिंदे गटात सहभागी

गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आता पर्यंत उध्दव ठाकरे यांच्यासोबत असणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील नॉट रिचेबल झाले असून ते शिंदे गटाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे काल माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. यात त्यांनी अजून काही आमदार आमच्या सोबत येणार असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्‍वभूमिवर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता नॉट रिचेबल झाले आहेत. ते लवकरच शिंदे गटात दाखल होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 

तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजपासून पुन्हा सक्रीय झाले आहेत. ते सक्रीय झाल्यामुळे राज्यातील घडामोडी प्रचंड गतीमान झाले आहेत. यातच आता एकनाथ शिंदेे यांच्या गटासोबत ५० आमदार झाले असून यामुळे ते भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Protected Content