ब्रेकींग : मंत्री उदय सामंत गुवाहाटीकडे रवाना !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाल्याचे वृत्त एएनआयने प्रकाशित केले आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाले असल्याचे वृत्त एएनआयने ट्विटरद्वारे प्रकाशित केले आहे. एनआयच्या वृत्तानुसार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणारे सामंत हे आठवे मंत्री आहे.

 

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत हे शनिवारी २५ जून रोजी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. त्यानंतर आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Protected Content