जळगावात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम जळगावच्या वतीने 26 जून रोजी अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रसिद्ध साहित्यिक वक्ते डॉ. मिलिंद बागुल असून उद्घाटन बहुजन फोरमचे सरचिटणीस एम. बी. अहिरे करणार असून सभेचे अध्यक्ष बहुजन फोरमचे अध्यक्ष शिवाजी वायफळकर असणार आहेत. सभेस अतिथी म्हणून बहुजन फोरमचे कार्याध्यक्ष धर्मभूषण बागुल, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कार्यकारी अभियंता जळगाव विजय पाटील, बहुजन फोरम उपाध्यक्ष डी. डी. भामरे, सहसचिव बि.डी. जाधव व कामगार कल्याण केंद्र संचालक रियाजुद्दिन शेख असणार आहेत.

या सोहळ्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्युत कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव चे उद्घाटन करण्यात येणार असून जयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव परिमंडळ सचिव व पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सोनवणे, संचालक सचिन जाधव, योगेश जाधव, राहुल वडनेरे, चेतन नागरे, योगेश लोखंडे, महेश अडकमोल, नमो सोनकांबळे, मनोज पवार, अनिल राठोड, चंद्रकांत महाजन, गोदावरी पवार, माधवी कुलकर्णी सह बहुजन फोरम चे जळगाव पदाधिकारी प्रशिक भास्कर, चरण पांढरे, प्रशांत शिरसाळे, विलास न्याहिदे, हर्षल जैन, तुषार श्रावगी, निळकंठ रायसिंग, पुरुषोत्तम कोळी, जावेद पटेल, देवेश बाविस्कर, नितीन रामकुवर, कमलेश भोळे, गणेश शर्मा, गणेश जाधव, इस्तीयाक पटेल, राजेंद्र कुमावत, सागर गायकवाड, प्रियतमा बुंदेले, यामिनी तायडे यांनी केले आहे.

 

Protected Content