Home Cities पाचोरा पाचोरा येथील चित्रकला महाविद्यालयाचा निकाल जाहीर

पाचोरा येथील चित्रकला महाविद्यालयाचा निकाल जाहीर

0
42


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कला संचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षा ए.टी.डी. प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला.

 

या निकालात गतवर्षाप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेतली असून स्व. अनिलदादा देशमुख महाविद्यालयातून अमृता गोविंद पाटील (प्रथम) , मयुरी गोकुळ राठोड (द्वितीय) तर मयुरी परशुराम पवार हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा कुसुम मित्रा, सचिव नरेश मित्रा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप पाटील, प्रा. निलेश शिंपी, जेष्ठ कला शिक्षक जितेंद्र काळे, राहुल पाटील, प्रमोद पाटील, शैलेश कुलकर्णी, सुबोध कांतायन, संदीप परदेशी, परशुराम पवार, राहुल सोनवणे तसेच पालकांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound