अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रामेश्वर खु|| येथे उद्यापासून चार दिवसीय भव्य गणपती व साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यात उद्या (दि.१३) सकाळी ८.०० वाजता मिरवणूक व पीठ मंडळ स्थापना रात्री ८.०० ते ११.०० दरम्यान साई चरित्राचे वाचन, दि. १४ रोजी अग्नी स्थापना, मंगल आवाहन, पूजन, हवन, प्रतिष्ठा. रात्री ८.०० ते ११.००० साईचारित्र वाचन, दि. १५ रोजी हवन, प्राणप्रतिष्ठा व पूर्णाहुती व रात्री ८.०० ते ११.०० साईचारित्र वाचन, दि.१६ रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद, ह. भ. प. जिवराम महाराज कापडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी, सुंदरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांची राहणार आहे. कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ओम साई धाम ट्रस्ट व रामेश्वर खु|| ग्रामस्थांनी केले आहे.