पाचोरा (प्रतिनिधी) शेतीसाठी लागाणाऱ्या रासायनीक खतांच्या किमतीत वाढ केली असून ही दरवाढ कमी करुन शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा अशी मागणी रयत सेनेने तहसीलदार याना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच खतांच्या किमती लवकर कमी न झाल्यास जिल्हाभर आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
रयत सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासुन सतत दुष्काळी परिस्थीती आहे व मागील वर्षी कमी पाउस झाल्याने शेतकऱ्यांना कमी उत्पन्न झाले. शासनाने दुष्काळ जाहीर करुन थोडीफार मदत केली पण शेतीसाठी लावलेले पैसे देखील मिळाले नसून व कर्ज सुद्धा फिटलेले नसतांना शासनाने अचानक रासायनीक खतांमध्ये दरवाढ केली. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर रयत सेना पाचोरा तालुका अध्यक्ष रमाकांत पवार, ए. जे. महाजन , शे.ईरफान शे.मन्यार ,विनायक मोरे , अनिल पाटील , शाम मोरे , मंगेश पाटील , रामा जठार , दत्ताभाऊ सोनार, शशिकांत बोरसे ,चंद्रकांत दत्तु , साहेबराव तडवी अदि च्या सह्या आहेत