धानोरा (!प्रतिनिधी) पत्रकारिता क्षेत्रात काम करतांना खऱ्या पत्रकारांना बोगस पत्रकारांमुळे त्रास होतो. यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेत बोगस पत्रकारांना कुठलेही स्थान नसल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी केले. ते गोलाणी मार्केट येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र कदम,तसेच प्रमुख अतिथी म्हणून लकी आण्णा(टेलर),ललित खरे हे उपस्थित होते. यावेळी बैठकीला जिल्हाभरातून मोठया संख्येने पत्रकार बांधव सहभागी झाले होते. ते पुढे म्हणले की, पत्रकारिता करतांना बऱ्याच वेळा पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात. याला कारणीभूत म्हणजे ज्यांचा पत्रकारिता क्षेत्राशी काहीही संबंध नसतो,अश्या बोगस पत्रकारांमुळे खऱ्या पत्रकारांना जनतेच्या टिका-टोमन्यांना सामोरे जावे लागत असते.अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नेहमी संघटनेशी निगडीत असलेल्या खऱ्या पत्रकारांच्या सदैव पाठिशी होती, आहे आणि नेहमीच राहील अशी ग्वाही दिली. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांचा संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला .जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.