मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण आग्रह करीत कायदा सुव्यवस्था उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर वांद्रे पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राणा दाम्पत्याच्या जामिनावर आजच्या ऐवजी २७ जूनला सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.
हनुमान चालीसा म्हणणारच असे आव्हान अमरावती चे आ. रवि राणा आणि खा. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर करीत कायदा सुव्यवस्थेला वेठीस धरू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, शिवाय माध्यमांना देखील प्रतिक्रिया देऊ नये अशा अटी घातल्या होत्या.
मात्र कोर्टाचे आदेश असूनही राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा आणि उद्धव ठाकरे याच्याविषयी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावरून त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता सरकारी वकील प्रदीप घरत यांनी व्यक्त केली असून याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही म्हटले आहे. परंतु न्यायालयाने आजच्या ऐवजी २७ जून रोजी यावर सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.