Home क्राईम भाऊंचे उद्यानासमोरून एकाची दुचाकी लांबविली

भाऊंचे उद्यानासमोरून एकाची दुचाकी लांबविली

0
45
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काव्य रत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोरून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल गोपाल वर्मा (वय-४७) रा. बुनकार वाडा, पांझरापोळ पाण्याच्या टाकीजवळ, विठ्ठल पेठ जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोनारकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनिल वर्मा हे दुचाकी (एमएच १९ एव्ही ५६१९) ने काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोर आले. त्याठिकाणी दुचाकी पार्क करून ते उद्यानात गेले. रात्री ८ वाजता परत असल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू मिळून आली नाही. अखेर तीन दिवसांनतर मंगळवारी १४ जून रोजी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रविण जगदाळे करीत आहे.


Protected Content

Play sound