रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील धान्यापासुन वंचित कुटुंबाना धान्यसाठा वाढवुन देण्याची मागणी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी केली आहे.
रावेर शहरासह तालुक्यात गरीब कुटुंबाना रेशन दुकानांद्वारे धान्य वाटप करण्यासाठी आहे. त्यापेक्षा अधिक धान्यसाठा वाढवुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, स्वस्त धान्य दुकाना मार्फत मिळणा-या अन्नधान्य बाबत अधिकारी कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की वरुन धान्य कमी येते. त्यावर आम्ही वरिष्ठ पातळीवर तपास केला असता धान्य हे सन २०१३ शासन निर्णया प्रमाणे धान्याचा पुरवठा हा रेशन दुकानदारांना देण्यात येत असतो. परंतु, आज सन २०१३ ते २०२२ अशी वर्ष झालेली आहेत. त्यात रावेर गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे लाभार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच गरीब कुटुंबाकडे रेशन कार्ड असल्यावर सुध्दा शासनाच्या या धान्यापासून वचिंत राहात आहे. या वंचित गरीब कुटुंबासाठी रावेर तालुक्याचा धान्यसाठा वाढवुन देण्याची मागणी अन्न पुरवठा मंत्रीकडे केली आहे.