Home क्राईम ज्येष्ठ पत्रकाराचा मोबाईल तिघांनी लांबविला

ज्येष्ठ पत्रकाराचा मोबाईल तिघांनी लांबविला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील ज्येष्ठ पत्रकार यांचा रिक्षा प्रवासादरम्यान अज्ञात तीन जणांनी १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे.  याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, खेडी बुद्रूक येथील आचार्य अत्रेनगर येथे ज्येष्ठ पत्रकार हेमंत शंकरराव काळुंखे (वय-६७) हे वास्तव्यास आहेत. ते मंगळवारी ८ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हॉटेल त्रिमुर्ती परिसरातील तुकाराम श्रीपाद चौधरी कॉम्प्लेक्स परिसरात आले होते. यादरम्यान पुन्हा घराकडे जाण्यासाठी रिक्षात बसले असता, रिक्षात काळुंखे यांच्याजवळ बसलेल्या तीन जणांनी काळुंखे यांच्या शर्टाच्या खिशातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. प्रकार लक्षात आल्यावर काळुंखे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन तीन जणाांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहेत.


Protected Content

Play sound