जामनेर (प्रतिनिधी) शहरातील कॉलनी परिसरामध्ये झालेले नवे रस्ते खोदून त्यात पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा चेंबरसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून छोट्या अपघातांची संख्या वाढली आहे. नवीन रस्ते होण्याची नागरिक वाट बघत आहेत.
रस्त्यावर धुळ जास्त प्रमाणात असल्याने श्वासोच्छ्वासाचे आजार होऊ लागले आहेत. रस्ते खराब असल्याने त्यावर चालणे अथवा वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी व्यक्त होत आहे.