Home क्राईम घरासमोरून एकाची दुचाकी लांबविली

घरासमोरून एकाची दुचाकी लांबविली

two wheelar thift

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ईश्वर कॉलनीतून मध्यरात्री एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रविवारी ५ जून रोजी रात्री एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश हेमलाल प्रजापती (वय-४८) रा. ईश्वर कॉलनी, जुना मेहरूण रोड जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, कामाला जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ टी ३३२२) क्रमांकाची दुचाकी आहे. १४ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ते कामावरून घरी आले. त्यावेळी त्यांनी त्यांची दुकाची घराच्या कंम्पाऊंडमध्ये पार्क करून लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार १५ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली. त्यांनी संपुर्ण मेहरूण परिसर पिंजून दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. २० दिवस दुचाकीचा शोध घेतल्यानंतर रविवारी ५ जून रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मिलींद सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound