जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वेच्या भिंतीलगत गावठी हातभट्टीची दारु विक्री करणार्यावर शहर पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. या ठिकाणाहून हजार रुपये किंमतीची दारु हस्तगत करण्यात आली असून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक वृत्त असे की, “शहरातील दूध फेडरेशन जवळील राजमालती नगरातील रेल्वेच्या भिंतीलगत राजू आत्माराम निसरकर (वय-३९, रा. राजमालतीनगर) हा गावठी हातभट्टीची दारु विक्री करीत होता.
दरम्यान शहर पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर धाड टाकून कारवाई केली. त्याच्याकडून हजार रुपयांची गावठी दारु हस्तगत करण्यात आली असून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”