शहरातील चंदू अण्णा नगरातील शेतकी महाविद्यालयाच्या मागे असलेल्या मंगळग्रह मंदिरात १ जून ते ९ जून दरम्यान नऊ दिवसीय श्रीमहालक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवार १ जून रोजी सकाळी ९ वाजता कलश यात्रा, ११ वाजता दशविध स्नान, दुपारी १२.१५ वाजता यज्ञमंडप प्रवेश, दुपारी २.१५ वाजता गणेश पूजन आणि दुपारी ३ वाजता अग्नि मंथन द्वारा अग्नी प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यानंतर २ जून ते ९ जून दरम्यान दररोज सकाळी ८ ते दुपारी १० वाजेपर्यंत आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महायज्ञाचे आयोजन केले आहे. गुरुवार ९ जून रोजी दुपारी १२ वाजता धुनीतप व श्रीलक्ष्मीनारायण महायज्ञाची पूर्णाहुती, तसेच दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या ठिकाणी अखंड श्रीराम चरित्र मानस पाठ सुरू राहणार आहे. या ९० वर्षीय श्री लक्ष्मी नारायण महाजन यांच्या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परमपूज्य सरजूदास महाराज यांनी केले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3030007433956539