भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील दीपनगर वीज केंद्रातील कोटेशन गेल्या सहा महिण्यापासून मुख्यालयाच्या आदेशाने बंद करण्यात आले होते. याबाबत मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून कोटेशन सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे, आश्वासन मुख्यअभियंता पंकज सपाटे यांनी वंचित बहूजन कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकारी यांना नुकतेच दिले आहे.
येथील वीज केंद्रातील कोटेशन पध्दत गेल्या सहा महिण्यापासून मुख्यालयाच्या आदेशान्वे बंद करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक कंत्राटदार, लहान कंत्राटदार यांच्यावर उपासमारीचा प्रसंग आला आहे. मुख्यअभियंता पंकज सपाटे यांना वंचित बहूजन कंत्राटदार संघटनेतर्फ विविध मागण्यांचे शक्तीगड येथे दिनांक 8 मे रोजी निवेदन देण्यात आले. सपाटे यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून त्यांना सांगितले की, लवकरच मुंबई येथील मुख्यालयातील संचालक,वरीष्ठ अधिकारी यांना मागण्या सबंधी माहीती देवून दीपनगर येथील बंद करण्यात आलेले काेटेशन पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी वंचित बहूजन कंत्राटदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठान,प्रदेश सचिव प्रकाश सरदार,संघटक प्रकाश तायडे,शाखाध्यक्ष नारायण झटके,उपाध्यक्ष दिनकर सुर्यवंशी,चिकु ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.