भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरणगाव येथून ट्रॅक्टर चोरून नेल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वरणगाव येथील गंगानगर भागातील रहिवासी असणार्या उमेश चौधरी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ४४ डी ५६९९) घरासमोर उभे होते. चोरटयांनी रविवारी रात्री ट्रॅक्टर लांबवल्याची घटना पहाटे उघड झाली. त्यामुळे त्यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर हे ट्रॅक्टर लांबवणार्या जळगावातील दोघा आरोपींच्या ताब्यातून जळगाव गुन्हे शाखेने चोरलेले ट्रॅक्टर जप्त केले. तसेच आकाश संजय पाटील व गणेश राजेंद्र शिंदे, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांनी वरणगाव येथून ट्रॅक्टर चोरीची कबुली दिली आहे.