म्हसावद येथील विवाहितेचा छळ : पतीसह सासू विरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील म्हसावद येथील सासर असलेल्या विवाहितेला माहेरुन रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या कारणासाठी तिचा छळ करणाऱ्या पतीसह एका जणांविरोधात गुरुवार, १९ मे रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

यावल तालुक्यातील बामणोद येथील माहेर असलेल्या नसीम आसिफ मन्यार (वय ३०) यांचा म्हसावद येथील आसिफ इस्माईल मन्यार यांच्याशी विवाह झाला आहे. नसीम हिने रिक्षा घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी पती आसिफ याच्यासह सासू उगराबी या दोघांनी नसीम हिच्याकडे केली. तसेच या कारणावरुन नसीम हिचा २००९ ते आजपावेतो माहेरी व सासरी अशा दोन्ही ठिकाणी शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने नसीम मन्यार यांनी गुरुवार, १९ मे रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन नसीम हिचे पती आसिफ इस्माईल मन्यार व सासू उगराबी ईस्माईल मन्यार दोन्ही रा. म्हसावद या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहेत.

Protected Content