पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | हे काय खेळण्यातील विमानतळ आहे का? की अजून एक विमानतळ द्या. असे काही होत नाही, विनाकारण बारामती, बारामती करू नका. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षातील आ. दिलीप मोहिते-पाटील यांची कानउघडणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका खाजगी हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त चाकण येथे आले होते. या प्रसंगी चाकण खेड, परिसरात विमानतळ झाले असते तर या परिसरातील एमआयडीसीचा विकास झाला असता, आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बारामतीला झाले त्याचा आनंद आहे. लोहगाव विमानतळ हे लष्कराचे आहे. त्यामुळं खेड, चाकण परिसरात किमान एक डोमेस्टिक विमानतळ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आ. दिलीप मोहिते पाटील यांनी केली.
यावर विमानतळ खेळण्यातील वस्तू नाही. त्याचा सर्व्हे करायला लागतो, एअरपोर्टच्या बाबतीत हवाई उड्डाण विभाग सर्व्हेक्षण होऊन संरक्षण विभागाकडून त्याला मान्यता येते. आणि इथे लष्कराच्या विमानांसाठी सराव आहे. त्यामुळे दोन- दोन विमानतळ देता येत नाहीत, एका विमानतळासाठी नाकी नऊ आलेत, किती वर्षापासून हा विषय सुरू आहे. गैरसमज घेऊन करू नका असेही उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले.