अजिंठा विश्रामगृह येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे शनिवारी सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मराठा समाज आरक्षण याचिकाकर्ते तथा स्व. आर.आर.पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटीलयांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मराठा उद्योजक विजय देसाई, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील, पियुष पाटील, केतन पाटील, भगवान शिंदे, कृष्णा पाटील, किरण पाटील, आकाश पाटील, शुभम बारसे, भूषण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content