छत्तीसगडमधील कारवाईत दोन नक्षलवादी ठार

Naxalite Kerala 710x400xt

दंतेवाडा (वृत्तसंस्था) छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात डीआरजी आणि एसटीएफच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. अरनपूरजवळ गोंदरसच्या जंगलात आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडोही सहभागी झाल्या होत्या.

 

गोंदरसच्या जंगलात बुधवारी पहाटे ५.०० च्या सुमारास नक्षलवादी आणि डीआरजी, एसटीएफ पथकातील जवानांमध्ये चकमक उडाली, त्यात जवानांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून रायफल, स्फोटके आणि अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ‘डीआरजी आणि एसटीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड फिमेल कमांडोजही (दंतेश्वरी दल) सहभागी झाल्या होत्या. या दलामध्ये नक्षली अथवा शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पत्नींना सहभागी करून घेतले जाते. एकूण ३० महिला या दलात असतात, त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

Add Comment

Protected Content