Home क्राईम लाहोर येथे दर्ग्याबाहेर पोलिसांच्या वाहनात स्फोट : आठ ठार

लाहोर येथे दर्ग्याबाहेर पोलिसांच्या वाहनात स्फोट : आठ ठार

0
60
lahore BLAST
lahore BLAST


lahore BLAST

लाहोर (वृत्तसंस्था) पाकिस्तानातील लाहोर येथे आज प्रसिद्ध सुफी दर्ग्याबाहेर शक्तिशाली स्फोट झाला. त्यात किमान आठ जण ठार झाले असून मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. तर अनेकजण जखमी झाले. सुफी दर्ग्यातील दाता दरबारबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनातच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दाता दरबारजवळील गेट क्रमांक २ समोरील पोलिसांच्या दोन वाहनांमध्ये हा स्फोट झाला. पाच पोलिसांसह सुरक्षा रक्षक आणि एक नागरिक यात ठार झाला. या स्फोटात २४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. लाहोरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अश्फाक अहमद खान यांनी ही माहिती दिली आहे. हा आत्मघाती हल्ला होता की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound