Home धर्म-समाज भुसावळात परशुराम जयंती निमित्त शोभायात्रा

भुसावळात परशुराम जयंती निमित्त शोभायात्रा

0
31
parshuram shobhayatra

parshuram shobhayatra
भुसावळ प्रतिनिधी । येथे ढोल-ताशांच्या गजरात भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात सर्वशाखीय वा सर्वभाषीक समाजबांधव सहभागी झाले.

श्री परशुराम जयंती उत्सव समितीतर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अष्टभुजा देवी मंदिरा जवळ भगवान परशुराम यांच्या पुर्णाकृती मुर्तीचे पुजन व आरती आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे,राजस्थानी विप्र समाज अध्यक्ष डॉ. कमलकांत शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. शोभायात्रेत कल्याण येथील राजमुद्रा ढोलताशा पथक खास आकर्षण होते. शिवाय फैजपूर येथील गुणवंत जोशी व त्यांच्या सहाकार्‍यांनी सादर केलेल्या कसरती लक्षवेधी ठरल्या. खास मराठमोळा पोशाख देखील काहींनी केला होता. पांडुरंग टॉकीज, लोखंडी पुल, हंबर्डिकर बेकरी, वसंत टॉकीज यामार्गे शोभायात्रा जाऊन. म्युनिसिपल पार्क भागातील राम मंदिरा जवळ समारोप झाला.

भगवान परशूराम उत्सव समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष सागर पत्की, सचिव उमाकांत शर्मा, कोषाध्यक्ष अमोल जोशी तसेच डॉ. कमलकांत शास्त्री, प्र. ह. दलाल, रघुनाथ मांडाळकर, योगेंद्र दुबे, कैलास उपाध्याय, जयप्रकाश शुक्ला, पंडित रवीओम शर्मा, प्रशांत वैष्णव, गणेश वढवेकर, आशुतोष दलाल, गोकुळ दुबे आदींनी उत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound