अमळनेर, गजानन पाटील | खानदेशातील शेवटची यात्रा असणाऱ्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त लालजींच्या रथाची भव्य मिरवणूक गुरूवारी सायंकाळी काढण्यात आली. त्यानंतर रथ मिरवणूक पूर्ण होऊन पहाटे परत संस्थानात दाखल होत असतो.
अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त लालाजींच्या रथाची भव्य मिरवणूक निघते. संपूर्ण खानदेशातील आकर्षण असलेला रथोत्सव शांततेत पार पडला. गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे हा यात्रोत्सव बंदच होता. मात्र, यावर्षी हाच यात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. अक्ष्यातृतीयेपासून संत सखाराम सखाराम महाराज यात्रा उत्साहात सुरु झाला आहे.रथ ओढण्यासाठी यंदा युवकांचा जोश ,उत्साह मोठा प्रमाणात दिसून येत होता. संत सखाराम महाराज की जय या नाम घोष ने प्रति पंढरपूर अमळनेर नगरी दुमदुमून गेली होती.