Home Cities जळगाव परशूराम जयंती मिरवणुकीत चतुर्वेदी महासभेतर्फे दुध वाटप

परशूराम जयंती मिरवणुकीत चतुर्वेदी महासभेतर्फे दुध वाटप

0
74

जळगाव प्रतिनिधी । भगवान श्री परशूराम जयंती मिरवणुकीत येथील चतुर्वेदी महासभेतर्फे मिल्कशेकचे वाटप करण्यात आले.

भगवान श्री परशूराम जयंतीनिमित्त जळगाव शहरातून बहुभाषक ब्राह्मण समाजातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाजबांधवांसाठी चतुर्वेदी महासभेतर्फे थंड दुधाचे वाटप करण्यात आले. नशिराबाद येथील चौबे परिवाराच्या सहकार्याने हे दुध वाटप करण्यात आले. यात अध्यक्ष देवानंद चतुर्वेदी यांच्यासह नितीन चौबे, मधुकर, सुधींद्र चौबे, वासुदेव चौबे, हरीश चौबे आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे सचिव सौरभ चौबे आणि तुषार चौबे यांनी विशेष सहकार्य केले. मिरवणुकीतील समाजबांधवांनी या सेवेचे लाभ घेत चतुर्वेदी महासभेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound