यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – यावल तालुक्यातील वड्री ग्रामपंचायतचे युवा सरपंच अजय भालेराव यांची भाजपा युवा मोर्चाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिकेत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यावल तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाच्या सभागृहात भाजपा पदाधिकाच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत वड्री ता. यावल येथील ग्रा.पं.चे युवा सरपंच अजय भालेराव यांची सर्वानुमते भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे , भाजपा तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, भाजपा ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, भाजपा जळगाव युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर भारंबे व सागर चौधरी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अजय भालेराव यांच्या निवडीचे उपस्थितांनी स्वागत करीत भालेराव यांचे अभिनंदन केले आहे.


