मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यासह देशात काही ठिकाणी संसर्ग बाधित रुग्णसंख्या वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना तसेच मुखपट्टी / मास्क वापराची सक्ती अमलबजावणी करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्रासह अन्य राज्यात कोरोना संसर्ग रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. तर बरेच जिल्हे संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मास्क वापर सक्तीचे निर्बंध हटवले आहेत. परंतु कोरोना संसर्ग रुग्ण संख्येवर नियंत्रण असले तरी काही राज्यात संसर्गामुळे रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा चित्रपटगृहे, नाटय़गृहे, सभागृहे, मॉल्स किंवा रेल्वे बसद्वारे प्रवास अशा गर्दीच्या तसेच बंदिस्त ठिकाणीपुन्हा मुखपट्टी / मास्क वापराची सक्ती लागू करण्याची मागणी वैद्यकीय कृतीदलाकडून मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी मास्क वापराची सक्ती हटवीण्यात आली असून मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर बंद केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही गर्दीच्या ठिकाणी तरी मास्कचा वापर सक्तीचा करण्याच्या अमलबजावणीसाठी राज्य सरकार विचार करीत असल्याचे प्रशासन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.