जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आपल्यावर निस्वार्थी प्रेम फक्त आई-वडिलच करु शकतात, त्यांच्या प्रेमाचा नेहमी आदर करा, दर महिन्यातून एकदा तरी त्यांची भेट घ्या, त्यांच्याजवळ राहा, जन्मदात्यांचे आशिर्वाद घ्या, दुसर्या मोठ्या शहरात जाऊन वैद्यकीय सेवा देण्यापेक्षा जन्मभूमीतच वैद्यकीय सेवा द्या, तिथे जे स्पेशालिस्ट डॉक्टर्स नाहीत, त्याचे पुढे शिक्षण घ्या, हार्डवर्क करा आणि जन्मभूमीलाच कर्मभूमी बनवतं यशस्वी व्हा असा कानमंत्र पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.तात्याराव लहाने यांनी दिला.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात दिक्षांत सोहळा थाटात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांची विशेष उपस्थीती होती. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरोले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील हे उपस्थीत होते. सर्वप्रथम राष्ट्रगीत तद्नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची प्रार्थना आणि मान्यवरांच्याहस्ते धन्वंतरी पूजनाने दिक्षांत सोहळ्यास प्रारंभ झाला. डॉ. माया आर्विकर यांनी कनव्होकेशन सुरु झाल्याचे जाहिर करताच भावी डॉक्टरांनी जल्लौष केला.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्यासमवेत डॉक्टर्स उपस्थीत होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून तब्बल १४७ डॉक्टर्स आज पदवी संपादन करुन वैद्यकीय सेवेसाठी बाहेर पडले असल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर्विकर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी काहींनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री गुंडेटी, विक्रांत गायकवाड, अमित साखरे, रुहान भुतडा, बुशरा खान, नाझील मोहम्मद यांनी केले.
पाल्यांची तुलना करु नका – डॉ.लहाने
वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साडे पाच वर्षे लागली, पुढे उच्च शिक्षणासाठी आणखी काही वर्षे जातील, मात्र त्याचवेळी त्यांच्यासोबतची अन्य मुले अभियांत्रिकी, वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त करुन चांगल्या नोकरी लागल्याचे आपल्याला दिसेल. त्यावेळी आपल्या पाल्याची तुलना करु नका, कारण वैद्यकीय सेवा ही व्यक्तीच्या शरिराशी संबधित आहे. त्याची तुलना होऊच शकत नाही, आणि ६० व्यावर्षी डॉक्टर्स रिटायड होत नसतो तर त्याचा मान, अनुभव वाढत जातो आणि वयाच्या ८० व्यावर्षी डॉक्टरला विशेष सन्मानप्राप्त होत असतो. त्यामुळे पाल्यांची तुलना इतरांशी न करता त्यांना त्यांच्या आवडीचे उच्च शिक्षण घेऊ द्या, असे आवाहनही पद्मश्री डॉ.लहाने यांनी केले.
ट्रॉफी, सन्मानचिन्ह, रोख बक्षीसाने टॉपर्सचा गौरव
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय व अंतिम वर्षातील टॉपर्सचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानचिन्ह, रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्व.वासुदेव पाटील पुरस्कार, डॉ.एन.एस.आविकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात डॉ.मितेश दामले, डॉ.अनुष्का गर्गे, डॉ.फोरम नीरव मातालिया, डॉ.सिद्धी धिंग्रा, डॉ.अनुपमा पाराशर, डॉ.भुपेंद्र पटेल, डॉ.भारती राजपाल, डॉ.प्रियंका पंड्या, डॉ.समृद्धी पाथरे आणि डॉ.अनुष्का कोचर यांचा समावेश होता.
यांना पदवी प्रदान
अडलिंग प्रतीक दादासाहेब, अग्रवाल यश मनोज, आकाश अनंत माने, अमन राजेश अग्रवाल, अमोल चौधरी, आमराव गायत्री सोपान, अमृता अच्युथन, अनुती द्विवेदी, अनुष्का हेगडे, बधाई निधी संतोष, बांगळकर हेमंत मोहनराव, बरड कृतिका नारायण, बारदेस्कर जॉयस इनास, बारदेस्कर रेबेका अगोस्टिन, भदाणे अरुंधती अनिलकुमार, भाग्यश्री रवींद्र मोरे, भाविका वर्मा, भोळें शुभम वसंतराव, भोळे पूर्वा ज्ञानदेव, भोंबाडे अभिजीत राजेंद्र, भोसले प्रशांत अण्णासाहेब, भोसले कार्तिकी शिवाजी, बिर्हाडेे क्षितीजा सुनील, चन्नावर रुतुजा गुणवंत, चौधरी मिलिंद महेंद्र, चेपे मुग्धा मनोज, चिंचोळे प्राजक्ता प्रमोद, चिंधे हर्षदा गंगाधर, चिन्नम वेणुगोपाल व्यंकटेश, चौगुले अजयकुमार शितल, दामले मितेश नागेश, देवरे अश्विंकुमार आनंदराव, देशमुख महेश कैलास, देशमुख रुषिकेश संभाजीराव, देशमुख साक्षी राजेश, देशपांडे आसावरी अभय, देशपांडे मैत्रेयी अनिल, धनोरकर कल्याणी मिलिंद, धिंग्रा सिद्धी विजय, धुमाले शितल भगवानराव, दोशी रोहन प्रकाश, फोरम नीरव मातालिया, गजमल सोनाली अनंत, गाला आयुषी जयंतीलाल, गाला मितील दीपक,गर्गे अनुष्का शिरीष, गेट सर्जेराव गंगाधरराव, गावंड मानसी प्रशांत, गावंडे निखिल प्रमोद, गिते ओजस विलास, गोंधळेकर नेहा राजेश, गोपाल कोमल सुरेश, हागे चैताली राजेंद्र, हमदुले रुकय्या मुनीर, होळंबे प्राची चंद्रशेखर, इंगळे प्रसेनजीत विलास, इसासरे क्षितिज भारत, जाधव अंशुला जयंतराव, जाधव श्रेया सतीश, जाधवर अक्षय वसंतराव, जैन खुशबू मनोज, जैन समीत सुनील, जैन सृष्टी सुनील, जयस्वाल ईशा मररेश, जेवीन जगदीश पंड्या, कदम श्रुती दीपक, कांबळे वृषाली हेमराज, कांदे सुरेश बळीराम, कारंडे द्वैता ज्ञानोबा, काझी मोहम्मद युसुफबासिल, केंद्रे रुपाली तुळशीराम, खानिजोन निखिता अरविन, कोचर अनुषा ओनिल, कोल्हे विवेक धोंडीराम, कोमरवल्लीवार श्रेयश सुनील, कोठारी पीयूष चंद्रकांत, लहाडे अनिरुद्ध शिवाजी, लोंडसे पूजा छगनलाल, माधनी श्रुती अजय, मदिहा मुस्कान अब्दुल सलीम, मगरे मयुरी देवानंद, माझी सखाराम गजानन, मापारा अनिरुद्ध सुनील, माथुरकर हिमाली सुभाष, मौर्य विजय रामजगन, मेघा नाईक, मिस्त्री श्लोक नवीन, मोहम्मद काशिद खोकर, मोहम्मद हाशिम खोकर, मोसेस सेलेस्टे सिगामनी, मुंडे संपदा श्रीकिसान, मुंढे दत्ता विष्णू, नायर सरिता ए, नयनसी हिम्मतराव निकम, नेहेते धवल दिवेश, पारखे किमाया प्रकाश, परमार कुणाल कुंजबिहारी, पाटील सलोनी लक्ष्मीकांत, पाटील संजीवनी संजय, पवार हृषिकेश राजेंद्र, परेरा ब्रायन पीटर, राणे हर्षद विजय, रश्मी भैरगोंद, रथी श्रुती अनिल, रवनीत कौर, रोडे फुलकित राजीव, रॉड्रिग्ज रुएल व्हॅलेरियन, रोहिदास शुभम शिवाजीराव, रुपाली ढोले, सक्रीकर तन्मय मनोज, सनेर प्राची विलास, साओजी ओजस्वी वीरेंद्र, सावलकर आयुष प्रशांत, सय्यद अझलफा अखलाक, शाह रिझवान अशफाक, शंतनू सेठ, शेजुळ मयूर संजय, शिंदे अजय नामदेव, शिंदे बापुदेव सुभाष, शिर्के रुतुराज अनिल, शिरसाट सुरभी भूपेश, शिवानी करमसिंग वळवी, सिंह आदित्य दिलीप, सिंह कोमल संजय, सोनवणे आकाश माणिक, सुदर्शन पाटील, सूर्यवंशी दीपाली संजय, सुवर्णा अनुष्का दिवाकर, स्वाती सुची, ठाकूर गौरव किशोर, ठोंबरे राजस मिलिंद, तिखे ललित सिद्धेश्वर, तिवारी मयुरेश दिवेश, तिवारी स्नेहा मनीष, उघाडे ओंकार अभिमन्यू, उस्मानी फैज अहमद, वर्मा रुची कमलकिशोर, विवेक रामदासानी, वाघमारे साईदीप बाबासाहेब, वलींजकर आदिती भारत, झिंजुरके सागर ज्ञानेश्वर, आकाश माणिकराव रेंगे, बोर्डे भूषण गजानन, देशमुख समृद्ध संजय, साखरे हिमांशू धीरज, सोळुंके प्रमोद अशोक, शाह निदा आफरीन नवाब निजामुद्दीन यांना पदवी प्रदान करण्यात आली.