Home धर्म-समाज माफी मागितली तरच मुंबई बाहेर जाऊ देऊ – मंत्री अनिल परब

माफी मागितली तरच मुंबई बाहेर जाऊ देऊ – मंत्री अनिल परब

0
32


 

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – ‘मातोश्री’वर हनुमान चालीसा पठन करण्यापासून राणा दांपत्यानी माघार घेतली आहे. असे असले तरी त्यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना मुंबई बाहेर जाता येणार नसल्याचा मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला आहे.
शुक्रवार पासून खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांनी आव्हानाची भाषा करत ते मुंबईत आले. आणि ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच असे आव्हान दिले होते. परंतु शुक्रवार आणि शनिवारी सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’ तसेच नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करीत राणा दाम्पत्याला बाहेर पडू दिले नाही. या पार्श्वभूमीवर अखेर राणा दांपत्यानी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय रद्द करीत आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. आहे.
परंतु आता पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे कारण सांगून राणा दांपत्य पळ काढत आहेत. त्यांनी मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवली असून माफी मागितल्याशिवाय राणा दांपत्याला बाहेर जाता येणार नाही. असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.


Protected Content

Play sound