सामान्य रूग्णालयात मोफत आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी २२ एप्रिल रोजी सामान्य रुग्णालयात भव्य मोफत आरोग्य मेळावा घेण्यात आला. आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. पंकज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी आणि परिचारीका उपस्थित होते.

भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. शुक्रवार २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आले. या मेळाव्यात लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिले गेले. यावेळी हेल्थ युनिक आयडी आणि आयुष्यमान भारत कार्डचे वाटप देखील करण्यात आले. दरम्यान या मोफत आरोग्य मेळाव्यात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, साथीचे आजार, कॅन्सर, गरोदर माता, स्त्री तपासणी, लहान मुलांचे आजार, किडनी आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, एचआयव्ही तपासणी यासह आदी आजार तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शासकीय योजनासाठी ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रक्त, लघवी, एक्स-रे आणि ईसीजी आणि आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया हे मोफत करण्यात आले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1136349287185806

 

 

 

Protected Content