Home Cities यावल माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते विरावली विकासो संचालकांचा सत्कार

माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते विरावली विकासो संचालकांचा सत्कार

0
68

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी विरावली विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार केला.

 

अरुणभाई गुजराथी यांनी विरावली विकास सोसायटीला भेट दिली असता विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन अर्जुनराव माणिकराव पाटील तसेच व्हाईस चेअरमन नरेंद्र दयाराम कोळी, विकासोचे संचालक ॲड देवकांत पाटील संचालक बाजीराव माणिकराव पाटील, संचालक प्रल्हाद गोकुळसिंग पाटील, संचालक गुलाब रघुनाथ पाटील, पीक संरक्षण संचालक गोरख पाटील, संचालक शरद पाटील, संचालक दिनकर पाटील, माजी चेअरमन संजीव पाटील, गणेश पाटील ,वाल्मीक पाटील, संग्राम पाटील , समाधान पाटील, देवीदास पाटील आदी सर्वांचे कौतुक केले. या सर्वांचे आशीर्वाद रुपी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, चोपडा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र पाटील व महाजन काका घुमावल, गावातील माजी सरपंच चव्हाण आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound