रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर शहरातील आयुष्यमान कार्ड धारक असलेल्या गरीब रुग्णांवर उद्या शनिवारी मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
रावेर शहरात आयुष्यमान कार्ड धारक असणाऱ्या गरीब रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया शनिवारी उद्या उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी पोटाचे तज्ञ डॉ. गौरवसिंग परदेशी व मुळव्याध तज्ञ डॉ. मोनाली पाटील सेवा बजावणार आहे. हे शिबिर नवजीवन मल्टीस्पेशालिटी क्लीनिक रावेर जुना नगर पालिका दवाखाना बस स्थानक समोर राबविण्यात येणार आहेत.