अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जैतपिर जिल्हा परिषद केंद्र (प्राथ) शाळेत जून २०२२ मध्ये इ. १ लीत दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा पुर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी आदी सहभागी झाले होते.
शाळा पूर्व तयारी मेळावा माजी सरपंच निलेश शिवाजी बागुल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. अध्यक्ष व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे फीत कापुन उद्घघाटन करण्यात आले. मेळाव्यामध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी सात प्रकारचे स्टाॅलची मांडणी करण्यात आली. यात प्रत्येक दाखलपात्र विद्यार्थ्याचे विकासपत्र भरुन घेण्यात आले. या विद्यार्थ्यांकडून विविध कृती करुन घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश बागुल यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकेश राजपुत तथा सदस्य व अंगनवाडी सेविका ,मदतनीस, स्वयंसेवक, केंद्र प्रमूख गोसावी सर तसेच ग्रा. प. सदस्य व ग्रामस्थ बंधु भगीनी तसेच पालक बंधु भगीनी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्तविक व सुत्रसंचालन कविता पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी कामकाज पाहिले. पालकांकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.