Home Cities जळगाव जेसीआय जळगाव सेंट्रलतर्फे नागरिकांना मोफत पाणी वाटप

जेसीआय जळगाव सेंट्रलतर्फे नागरिकांना मोफत पाणी वाटप

0
45

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जेसीआय जळगाव सेंट्रलतर्फे वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी नवीन बस स्थानक येथे मोफत पाणी वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.

सध्या उष्णतेच्या वाढत्या उष्मांकाने नागरिकांचे हाल होत आहे. उन्हाळ्यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. सकाळी ११ वाजेनंतर पारा ४२ अंशाने पुढे जात असल्याने नवीन बस स्थानक येथे जेसीआय जळगाव सेंट्रल तर्फे मोफत पाणी वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.  थंडगार पाणी पिण्यासाठी मिळाल्याने नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून काहीसा दिलासा मिळाला.

यावेळी जेसीआय जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष सी.ए. वेणुगोपाल झंवर, सचिव तुषार बियानी, सदस्य ऋषभ शाह, अभिलाष राठी, हर्षल मंडोरा, पंकज भावसार, निलेश मणीयार, प्रसाद झंवर, निखिल कटारिया, कल्याणी झंवर, दिव्या झंवर आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound