Home Cities अमळनेर अमळनेर पं.स. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आयुक्तांकडून नोटीस

अमळनेर पं.स. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आयुक्तांकडून नोटीस


772505 state information commission

मळनेर(प्रतिनिधी) येथील पंचायत समितीचे माहिती अधिकारी तथा सहाय्यक गट विकास यांना शास्तीची तर येथील गट विकास अधिकारी तथा विकास अधिकारी उ. श्रे. पंचायत समिती याना शिस्तभंगविषयक कारवाईची नोटीस माहिती आयुक्त कार्यालय नाशिक यांनी नुकतीच बजावली आहे.

 

यासंदर्भात १३ मार्च २०१९ रोजी सुनावणी झाली होती, त्यानंतर सदर आदेशाची प्रत आजच संबंधिताना प्राप्त झाली आहे. त्यात माहिती अधिकारी यांनी मुदतीत माहिती दिली नाही आणि अपिलीय माहिती अधिकारी यांनी मुदतीत सुनावणी घेतली नाही म्हणून माहिती अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी यांना शास्तीची तर गट विकास अधिकारी तथा विकास अधिकारी उ.श्रे. पंचायत समिती याना शिस्तभंगविषयक कारवाईची नोटीस माहिती आयुक्त कार्यालय नाशिक यांनी दिली आहे. पुढील कारवाईचे आदेश जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound