Home Cities जामनेर राज्यस्तरीय अबॅकस व वैदिक गणित स्पर्धेत जामनेरचे विद्यार्थी यशस्वी

राज्यस्तरीय अबॅकस व वैदिक गणित स्पर्धेत जामनेरचे विद्यार्थी यशस्वी

0
108

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव येथे वेदिकस इंटरनॅशनल अकॅडमीतर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस व वैदिक गणितच्या स्पर्धेत जामनेर विद्यार्थ्यांनी अबॅकसच्या ८ लेव्हलपैकी ३ लेव्हलमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत यश प्राप्त केले.

राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थी-

– अनुराग भरत राठोड राज्यस्तरीय स्पर्धेत चौथ्या लेव्हलमध्ये अबॅकस व पहिल्या लेव्हल वैदिक गणितमध्ये राज्यातून प्रथम.

– जय बाजीराव महापौर पाचव्या लेव्हल अबॅकसमध्ये राज्यातून प्रथम.

– शुभम नटवर चव्हाण सहाव्या लेव्हलमध्ये अबॅकस राज्यातून प्रथम व वैदिक गणित दुसऱ्या लेव्हल मध्ये राज्यातून द्वितीय.

– जय विनोद पाटील वैदिक गणित मध्ये राज्यातून तृतीय.

– प्रज्ञेश संजय सुरवाडे अबॅकस तिसऱ्या लेव्हल मध्ये राज्यातून तृतीय.

त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धेत पहिल्या १० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रेहांश राठोड, लक्ष्य राठोड, दुर्गेश गीते, संस्कृती नाईक, आरुष महाजन, सुशांत सोनवणे, सृष्टी माळी, आशिष चव्हाण, अंशुमन राठोड, प्रणव सोनवणे, देवानंद नाईक, अनन्या हडप या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले.

तसेच हिमांशू चव्हाण, आराध्या राठोड, जान्हवी सोनवणे, कार्तिक आगळे, ओजस्विनी सैतवाल, रिया पाटील, ओम पाटील, युग चौधरी, नरेंद्र जाधव, मोहिनी सुरवाडे या गुणवंत विद्यार्थ्यांनी सुद्धा यश संपादन केले. या सर्व गुणवंत कीर्तिवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound