भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आज तीन जणांविरुद्ध वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘शहरातील इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणारी बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी मदरशात जाते असे सांगून दि.११ एप्रिल रोजी घराबाहेर पडली. शेजारीच राहणारा संशयित आरोपी मजीद शहा हमीद शहा याने तुझ्याशी काम आहे. असे सांगत मोटरसायकलवर बसवून बोदवड रस्त्याने नेले.
या ठिकाणी गाडीचे पेट्रोल संपल्याने पेट्रोल घेण्यासाठी एकटेच सोडून गेला. थोड्या वेळानंतर पिंपळगावकडून दोन मित्र आले व त्यांनी तुला मजीदने बोलवले असे सांगितलं. त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानंतर मजीद शहा स्वतः आला व त्याने अल्पवयीन मुलीला रोडच्या बाजूच्या खड्ड्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिला तेथेच सोडून निघून गेला. यावेळी मोसिन शहा व आदिलशहा हा या दोघांनी रस्त्यावर लक्ष ठेवले.
सायंकाळी पीडित मुलीच्या काकाने तिला घरी सोडले. आई-वडिलांनी विचारपूस केल्यावर सदर प्रकार उघडकीस आल्याने याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आज दि,१२ एप्रिल रोजी वरणगाव पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशिषकुमार आडसुळ तपास करीत आहे.