Home Cities यावल यावल सा.बां. विभाग उपविभागीय अभियंतापदी जे.एस. तडवी यांची नियुक्ती

यावल सा.बां. विभाग उपविभागीय अभियंतापदी जे.एस. तडवी यांची नियुक्ती

6c0c1b7d 951f 475c b3cc e4fa33445713
6c0c1b7d 951f 475c b3cc e4fa33445713

6c0c1b7d 951f 475c b3cc e4fa33445713

यावल( प्रतिनिधी) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता पदाचा पदभार जे.एस. तडवी यांनी स्वीकारला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या कार्यरत असलेले उपविभागीय अभियंता आर.आर. चिरमाडे हे सेवानिवृत झाले असून, त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर मुळ यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथे आदिवासी कुटंबात जन्मलेले व सार्वजनिक विभागात सेवारत असलेले वरिष्ठ उपविभागीय अभियंता जे.एस. तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

श्री. तडवी यांनी पदाची सुत्रे सांभाळताच सर्वप्रथम रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी केली. आपल्या २३ वर्षांच्या शासकीय सेवा कार्यात त्यांनी सावदा (ता. रावेर) येथून आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला होता. त्यानंतर त्यांनी धुळे, चोपडा, जळगाव आणि २०००ते २००७ या काळात यावल येथील विभागात कनिष्ठ अभियंता म्हणुन सेवा बजावली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा तालुक्यातील आदीवासी क्षेत्राला निश्चित फायदा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound