Home क्राईम तरूणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

तरूणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला; परिसरात खळबळ


जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कापूसवाडी येथील ३८ वर्षीय तरूणाचा शेताच्या बांधावर मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून पाच संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

 

उत्तम रघुनाथ धोनी (वय-३८) रा. कापूसवाडी ता. जामनेर जि.जळगाव या तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, कापुसवाडी येथील उत्तम रघुनाथ धोनी यांच्याकडे गावातील एका इसमाचे पैशाचा व्यवहार होता. त्याबाबत वेळोवेळी दोघांमध्ये भांडण झाले होते. ६ एप्रिल रोजी कापुसवाडी येथे एका उत्तरकार्याचा कार्यक्रमांमध्ये पैशाच्या कारणावरून मयत संजय एकनाथ पाटील व सहा-सात जणांमध्ये बाचाबाची होऊन उत्तम धोनी यांना मारहाण झाली होती. यामुळे  मयत उत्तम धोनी यांना अपमान वाटला व त्यांनी चार चाकी वाहन घेऊन शेताकडे निघाला. रात्री घरी आला नाही त्यामुळे पत्नी व नातेवाईकांनी शोधाशोध केली असता बुधवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उत्तम धोनी यांचा मृतदेह विजय उबाळे यांच्या शेतात मयत अवस्थेचा आढळून आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती.  जामनेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जामनेर पोलिसात डॉ. आर के पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्या आहे की घातपात असल्याची संशय व्यकत केला जात आहे. दरम्यान पतीचा घातपात केल्याचा आरोप मयत उत्तम धोनीची पत्नी यांनी केला असून या संदर्भात पोलीसांनी गावातील पाच संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

 


Protected Content

Play sound