Home Cities जळगाव खडके प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार

खडके प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार


.jpg

जळगाव प्रतिनिधी । लोकशिक्षण मंडळ जळगाव संचलित स्वा. सौ. ज .सु.खडके प्राथमिक विद्यामंदिरातील पाच विद्यार्थी स्काऊट गाईड विभागाद्वारे कब बुलबुल पथकातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ऍरो बॅज सुवर्णबाण पदक ने सन्मानित केले गेले संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून फक्त या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे हे विशेष.

सेवा स्वावलंबन शिस्त स्वच्छता कौशल्य इत्यादीवर आधारित(२ वर्षाचा अभ्यास ) विविध प्रात्यक्षिक परीक्षा द्वारे मूल्यमापन करून विविध चाचण्या घेऊन हा सन्मान दिला जातो चि.गीत निलेश अत्तरदे प्रथमेश रवींद्र चौधरी प्रथमेश विकास कोळी कुणाल प्रमोद ठाकूर जयेश किशोर बारी या विद्यार्थ्यांचा खास गौरव व सन्मान संस्थेचे चिटणीस श्री अवधूत पाटील शाळा समिती अध्यक्षा सौ सिंधुताई कोल्हे शाळा समिती सदस्य श्री राजशेखर चौधरी श्री गिरधर जावळे मुख्याध्यापिका सौ निर्मला चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या पुरस्कारासाठी मार्गदर्शन करणारे कब मास्टर सुनिल पवार यांचाही सत्कार सन्मान मान्यवरांनी केला.

संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब विजय पंडितराव कोल्हे, जळगाव शहराचे माजी महापौर ललित कोल्हे यांनी शाळेचे, शिक्षकांचे, पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, स्काऊट गाईड जिल्हा संस्थेचे सचिव बी.व्ही.पवार, माजी संघटक एस.पी.आठवले, संजय बेलोरकर यांनी सर्वांनी विशेष अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound